-
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी जेडी व्हॅन्स यांची निवड केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर रिपब्लिकन ओहायोचे सिनेटर जेडी व्हॅन्स यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करून लोकांना धक्का दिला. (फोटो: रॉयटर्स)
-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की २०१६ मध्ये जेडी व्हॅन्स ट्रम्प यांचे कट्टर विरोधक होते. मात्र, आता ते ट्रम्प यांच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक आहेत. २ ऑगस्ट १९८४ रोजी मिडलटाउन ओहायो येथे जन्मलेल्या जेडी व्हॅन्स यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी केले. (फोटो: रॉयटर्स)
-
व्हॅन्स सुरुवातीला United States Marine Corps मध्ये भरती झाले होते आणि इराक युद्धात त्यांनी कामही केले. त्यानंतर त्यांनी स्टेट यूनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. व्हॅन्स यांनी येल लॉ स्कूलमधून (Yale Law School) पदवी प्राप्त केली. ते येल लॉ जर्नलचे संपादकही राहिले आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
२०१३ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ वकील म्हणूनही काम केले. यानंतर ते सॅन फ्रान्सिस्कोला टेक इंडस्ट्रीमध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून काम करण्यासाठी गेले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये व्हॅन्स यांनी PayPal चे सह-संस्थापक पीटर थिएल यांच्या मिथ्रिल कॅपिटलमध्ये काम केले. (फोटो: रॉयटर्स)
-
३९ वर्षीय जेडी व्हॅन्स २०१६ मध्ये त्यांच्या ‘हिलबिली एलेगी’ (Hillbilly Elegy) पुस्तकाच्या प्रकाशनानंतर प्रकाशझोतात आले. जेडी व्हॅन्स यांचे पुस्तक अमेरिकेत खूप गाजले आणि बेस्टसेलर ठरले. (फोटो: रॉयटर्स)
-
यानंतर २०२० मध्ये या पुस्तकावर एक फीचर फिल्मही बनवण्यात आली. दरम्यान, या पुस्तकात त्यांनी मिडलटाऊनमध्ये राहणाऱ्या गोऱ्या कामगारांचा संघर्ष सांगितला आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
जेडी व्हॅन्स यांनी २०२१ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते २०२२ मध्ये ओहायो येथून रिपब्लिकन पक्षाकडून सिनेट निवडणुकीत निवडून आले. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी व्हॅन्स यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा दिला. (फोटो: पीटीआय)
-
जेडी व्हॅन्स यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांचे भारताशी विशेष नाते आहे. त्यांची पत्नी उषा चिलुकुरी व्हॅन्स या मूळच्या भारतीय आहेत. आंध्र प्रदेशात असलेला उषा यांचा परिवार काही दशकांपुर्वी दिएगो, कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाला. (फोटो: पीटीआय)
-
कॅलिफोर्नियात जन्मलेल्या उषा एका नॅशनल लॉ फर्ममध्ये वकील आहेत. येल लॉ स्कूलमध्ये शिकत असताना उषा आणि व्हॅन्स यांची पहिली भेट झाली. ग्रॅज्युएशननंतर २०१४ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. त्यांना तीन मुले असून त्यांची नावे इव्हान, विवेक आणि मिराबेल आहेत. हे जोडपे त्यांच्या मुलांसह सिनसिनाटी येथे राहतात. (फोटो: पीटीआय)
(हे पण वाचा:PHOTOS : डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी अमेरिकेच्या ‘या’ अध्यक्षांवरही झाले आहेत जीवघेणे हल्ले! वाचा माहिती )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”