-
आज राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आषाढी एकादशीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo- PTI)
-
पंतप्रधानांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी मराठीतून या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.”, ही मराठी भाषेतील पोस्ट मोदींनी केली आहे.
-
दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे वारकऱ्यांसह सहभाग नोंदवला. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
उपमुख्यमंत्र्यांचा आणखीन एक फोटो, यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर सहकारीही दिसत आहेत. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पूजा करताना.
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे