-
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री खूप लोकप्रिय आहेत. ते फक्त भारतातच नाही तर अनके देशांमध्ये फिरतात व कथा वाचन करतात.
-
नुकतेच ते काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला प्रवचनासाठी गेले होते. जिथे त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी अनेक लोक आले होते. जगभरात प्रवचन करणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री किती शिकलेले आहेत ते जाणून घेऊया.
-
पंडित धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक स्थळ बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख आणि पुजारी आहेत.
-
धीरेंद्र शास्त्री हे हनुमानाचे भक्त आहेत.
-
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी गंज गावातून सुरुवातीचे शिक्षण घेतले. याच गावातून त्यांनी हायस्कूल आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
-
यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. मात्र, धिरेंद्र शास्त्री हे केवळ आठवी पास असल्याचा दावाही अनेकजण करतात.
-
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
धीरेंद्र शास्त्री हे प्रसिद्ध कथाकार आहेत आणि त्यांच्या कथा ऐकायला व प्रवचनाला लाखो लोक येतात. धीरेंद्र शास्त्रींच्या आधी त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग बागेश्वर धाममध्ये कथा वाचन करायचे.
-
(सर्व फोटो- बागेश्वर धाम सरकार एक्स अकाउंट)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार