-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत.
-
दरम्यान, नुकताच प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकार यावेळी उपस्थित होते.
-
दरम्यान, ‘धर्मवीर २’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर भाष्य करणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
-
ट्रेलर प्रदर्शित झाल्यांनतर, त्यामधील काही सिन्सवरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना उबाठाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
केदार दिघे म्हणाले..
“गेल्या अडीच वर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेंचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती दिली होती. तो हार्टअटॅकमुळे झाला, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मग आता निवडणुकीपूर्वी किंवा काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ नेमका काय?” असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. -
केदार दिघे पुढे म्हणाले, “याचाच अर्थ तुम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी २२ वर्ष साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करत राहिलात. तुमच्या या दैवतावर, तुम्हाला ज्याने घडवलं अशा नेत्यावर जेव्हा अन्याय होत होता, तेव्हा तुम्ही गेल्या २२ वर्षांपासून गप्प का बसलात? हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन च्या टीम कडून अपमान आहे! ‘तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार’, असा संवाद दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर दोन चित्रपटात टाकण्यात आला आहे. मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते, मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील? आणि ते शिंदेंना का सांगतील?” असा प्रश्नही केदार दिघेंनी उपस्थित केला आहे.
-
त्यामुळे ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या ट्रेलरमध्ये शेवटी मंगेश देसाई हे संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारु? दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा? असा प्रश्न क्षितिज दाते यांना विचारताना दिसत आहे. यावरुनच सध्या सर्वत्र राजकीय चर्चा घडताना दिसत आहे.
-
त्यामुळे आता केदार दिघे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
दरम्यान ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर काल २२ जुलै रोजी धर्मवीरच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
-
यावेळी चित्रपटातील कलाकार, आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेही उपस्थित होते.
-
या भेटीची एक रील मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”