-
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा म्हणजेच भारताचा २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा सर्वसाधारण-अर्थसंकल्प सादर केला आहे. यासह त्यांनी एक नवा विक्रमही त्यांच्या नावावर केला आहे. सीतारमण यांच्याशी संबंधित काही महत्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात. (PTI)
-
मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडत निर्मला सीतारमण या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. (PTI)
-
तसेच इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारमण या भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. (PTI)
-
सीतारमण यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी प्रारंभिक शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूल, विल्लुपुरम येथून केले. याशिवाय त्यांनी मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथूनही शिक्षण घेतले आहे. (PTI)
-
शालेय शिक्षणानंतर, निर्मला सीतारमण यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून BA- Eco ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या दिल्लीला पोचल्या. (PTI)
-
निर्मला सीतारमण यांनी १९८४ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.फिल केले आहे. त्यानंतर त्यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला. पण त्यांना पीएचडीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचे पती परकला प्रभाकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी करण्यासाठी लंडनला जाणार होते आणि त्यामुळे निर्मला सीतारमण यांनाही त्यांच्यासोबत जावे लागले होते. (PTI)
-
सीतारमण यांना लंडनमध्ये सेल्सची नोकरी मिळाली. येथे त्यांनी रीजेंट स्ट्रीट येथील होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम केले. त्यांच्यामुळे क्रिसमस सीजनमध्ये कंपनीला चांगला नफा झाला, त्या बदल्यात कंपनीने त्यांना शॅम्पेनची बाटली भेट म्हणून दिली होती. (PTI)
-
यानंतर त्यांनी काही काळ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्येही काम केले. नंतर त्यांनी प्राइम वॉटरहाऊस कूपर्स या ऑडिट फर्ममध्येही काम केले. (PTI)
-
निर्मला सीतारमण यांचे सासरे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांचे सासू-सासरे दोघेही काँग्रेसममधून राहिले आहेत. त्यांच्या सासू परकला कालिकांबा या आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत, तर त्यांचे सासरे परकला शेषावताराम हे आंध्र प्रदेशात मंत्री राहिले आहेत. (PTI)

Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार