-
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्याही समाधानकारक झाल्या आहेत. (संग्रहित छायाचित्र)
-
राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता. (फोटो- लोकसत्ता टीम)
-
मात्र औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा असून नाशिक विभागात तो २८.३४ टक्के इतका आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांमध्ये अजूनही एक हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक-पेरण्या, पाणीसाठा, टँकर्स आदींसंदर्भात कृषी विभागाने सादरीकरण केले. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)
-
मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात सरासरीहून अधिक पाऊस झाला असला तरी औरंगाबाद व नाशिक विभागात कमी पाऊस झाला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)
-
राज्यात २२ जुलैपर्यंत सरासरी ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
मागील वर्षी या दिवसापर्यंत सरासरी ४२२ मि.मी. पाऊस झाला होता. ( संग्रहित छायाचित्र)
-
राज्यात खरिपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र))

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”