-
महाराष्ट्रात काल रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
-
मुंबईसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
-
सखल भागात पाणी साचलं आहे. कल्याण स्टेशजवळ गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
-
नवी मुंबई, पनवेलमध्ये मध्यरात्री पासून पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, मुंबई, पुण्यामध्ये येत्या ४८ तासात पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाने बचावपथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
-
पुणे, मुंबईतील काही ठिकाणी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
-
राज्यातील पुणे, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी आहे.
-
सातारा अकोला अमरावती नागपूर ठाणे पालघर येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील खडकवासला परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असल्याने खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचीही पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे धरणाचा स्वयंचलीत दरवाजा उघडण्यात आला आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.
-
आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड येथेही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
दरम्यान पुढील चार तासात संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते त्यामुळे गरजेचे असेल तरच बाहेर पडा असा आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
(सर्व फोटो प्रतीकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित आहेत)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”