-
महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे.
-
काल मध्यरात्रीपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
-
हे छायाचित्र पुण्यातील आहे, लुल्लानगर उड्डाणपुल परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसात रस्त्यालगतचे झाड उन्मळून पडले आहे.
-
दरम्यान पुण्यातील मुठा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे.
-
त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
-
आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यालगत असलेली मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.
-
त्यामुळे नजीकच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही नागरिक घरात अडकून पडले आहेत.
-
दरम्यान यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
-
दरम्यान सिंहगड रस्त्यावरील अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे.
-
एनडीआरएफचे बचाव पथक बोटीसह तिथे दाखल झाले आहे.
-
सिंहगड रस्त्यावरील ५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.
-
एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्यांना पाण्याने घेरले आहे.
-
तसेच भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत, संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे.
-
नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचे पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
-
जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. (All Photo Source : Express photograph by Arul Horizon 25/07/2024 Pune) हेही वाचा- Pune- Mumbai Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, धरणांची पाणी पातळी वाढली; बचावपथकांना सज्ज राहण्याचे प्रशासनाचे आदेश!
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे