-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या आरजेडीच्या महिला आमदारावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सभागृहाचे कामकाज सुरू असताना विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर नितीश कुमार एका महिला आमदारावर संतापले. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या महिला आमदार? (PTI)
-
ज्या महिला आमदारावर मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले आणि संतापले त्या आरजेडीच्या आमदार रेखा पासवान आहेत. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
२०२० मध्ये रेखा पासवान यांनी बिहारमधील मसौरी मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी जेडीयूच्या नूतन पासवान यांचा ३२,२२७ मतांनी पराभव केला. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
बिहार विधानसभेत पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ केला. सभागृहात ६५ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी विरोधक आंदोलन करत होते. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
दरम्यान, रेखा पासवान यांना फटकारताना नितीश कुमार म्हणाले की, “तुम्ही एक महिला आहात, तुम्हाला काही माहिती नसते. इथे बोलत आहात, इथे कशा आलात? या लोकांसोबत इथपर्यंत कशा आलात?, या लोकांनी कधी महिलांना पाठींबा दिला का? कधी त्यांना संधी दिली का?” (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
याच रेखा पासवान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत होत्या. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आणि गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
यानंतर रेखा देवी म्हणाल्या होत्या की, भाजपचे खासदार त्यांच्या समर्थकांना वाचवण्यासाठी हे हल्ले करत आहेत, तर या आरोपांखाली आरजेडीच्या दलित कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)
-
रेखा पासवान यांनीही याबाबत एफआयआर देखील दाखल केली होती. (@Rekha Paswan (Rekha devi)/FB)

अखेर ‘तो’ निर्णय रद्द… शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापनाने सोडला सुटकेचा निश्वास