-
कालच्या दमदार पावसामुळे पुण्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
तर मु्ंबईसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांतही काल दमदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
-
पुण्यामध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर करावे लागले.
-
पुणे शहराला मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
-
पुणे आणि कोल्हापुरातील अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
-
दरम्यान आज २६ जुलै रोजी राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरण कायम आहे.
-
मुंबई-पुण्यातील परिस्थिती हळू हळू पूर्वपदावर येत आहे. पुण्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. मुंबईत पावसाची स्थिती सामान्य झाली आहे. शाळा महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे.
-
मुंबईत पाऊस कमी झाल्याने येथे शाळा आज नियमितपणे सुरु राहणार आहेत. पण राज्याच्या इतर भागात रेड अलर्ट दिल्याने जवळपास ८ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर जास्त असून येथे पूर येण्याचा धोका आहे.
-
पुण्यात आज पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र अनेक भागात चिखल झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते.
-
याशिवाय आता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या येथून फक्त १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. आधी ३१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस थांबला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
दरम्यान पुण्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. तरी प्रशासन अलर्ट आहे.
-
अजूनही महापालिकेचे अधिकारी, लष्कर आणि एनडीआरएफचे पथक येथे तैनात आहेत. शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये काल गुरुवारी ७ जणांचा मृत्यू झाला.

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”