-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २७ जुलै रोजी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यातील काही नेते महाराष्ट्रातीलही आहेत. त्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे. हरिभाऊ यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरिभाऊ यांनी कधी काळी वर्तमानपत्र विकायचे काम केले आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
हरिभाऊ आरएसएसमधून भाजपामध्ये दाखल झाले. १७ ऑगस्ट १९४५ रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे जन्मलेल्या हरिभाऊ किसनराव बागडे यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले आहे. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
हरिभाऊंनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये प्रवेश केला होता. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
१९८५ मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
हरिभाऊ किसनराव बागडे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत. लोक हरिभाऊंना नाना नावाने सुद्धा हाक मारतात. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
हरिभाऊंचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील शेतकरी होते आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हरिभाऊंनी अनेक वर्षे औरंगाबादच्या फुलंब्री येथे घरोघरी वर्तमानपत्रे विकली. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
शेतकरी कुटुंबातील हरिभाऊंना शेतीची खूपच आवड आहे. त्यांनी त्यांच्या घराचे नाव कृषी योग ठेवले आहे. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
हरिभाऊ किसनराव बागडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. २०१४ मध्ये, जेव्हा भाजपाने महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)
-
हरिभाऊ किसनराव बागडे हे राजस्थानचे ४५ वे राज्यपाल बनले आहेत. राज्याचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्रा यांचा कार्यकाळ २१ जुलै रोजी पूर्ण झाला. (@Haribhau Bagade – हरिभाऊ बागडे/FB)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार