-
केरळमध्ये आतापर्यंतची सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती घडली आहे, राज्यातील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १४३ लोक मृत्युमुखी पडले आहेत. (रॉयटर्स)
-
याशिवाय १२८ लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. (काँग्रेस केरळ /ट्विटर)
-
मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा या निसर्गसंपन्न असलेल्या गावांमध्ये भूस्खलनाच्या घटनेने मृत्यू आणि भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. (पीटीआय)
-
३००० हून अधिक लोकांना जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ४५ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले. (पीटीआय)
-
आर्मी, नेव्ही आणि एनडीआरएफचा समावेश असलेले बचाव पथक एकत्रितपणे या दुर्घटनेत अडकलेल्या बाधितांचा शोध घेत आहेत. बाधितांना मदत देण्यासाठी अनेक एजन्सी एकत्रितपणे काम करत आहेत. (रॉयटर्स)
-
कन्नूरमधील डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी) केंद्रातील २०० सैनिक, वैद्यकीय पथके भूस्खलनाच्या घटनेत मदत करण्यासाठ तैनात करण्यात आले आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. (पीटीआय)
-
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. तसेच तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत सर्व संस्थामधील मदत कार्यात समन्वय राखला जाईल याची काळजी घेत कोणत्याही मदतीची गरज असेल तर कळवण्यास सांगितलं आहे. (पीटीआय)
-
या दुर्घटनेची काही छायाचित्रे समोर आली आहेत, या छायाचित्रांवरून तेथील भीषण परिस्थितीचा अंदाज लावता येतो. (काँग्रेस केरळ /ट्विटर)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती