-
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मणिकर्ण खोऱ्यातील टेकड्यांवर ढग फुटी झाली, त्यामुळे तोश या खाडी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, ढगफुटीमुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (PTI Photo)
-
या मुसळधार पावसात दारूची दुकाने, किराणा दुकाने तसेच जवळील पूल वाहून गेला आहे. तसेच आतमध्ये मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्याने दोन हॉटेल आणि काही लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा ढग फुटी झाल्यांनतर येथे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. (Photo Source:@rajender11117/instagram)
-
दरम्यान, या पावसाळ्यात कुल्लू मनालीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तोश खाडीला पूर आला असून, त्यामुळे तेथील पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने तोश गावाचा संपर्क तुटला आहे. (Photo Source: @rajender11117/instagram)
-
तोश खाडीला पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह इतका वेगवान झाला होता की त्यामुळे सर्वत्र विध्वंस झाला. दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. (Photo Source: @rajender11117/instagram)
-
मिळालेल्या माहितीनुसार, तोश गावातील खाडी परिसरात मध्यरात्री अचानक ढगफुटी झाल्याने लोकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली. या घटनेनंतर प्रशासनाने महसूल विभागाचे पथक नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी रवाना केले आहे. (Photo Source: @rajender11117/instagram)
-
दरम्यान, तोश गावातील ढगफुटीच्या घटनेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. (PTI Photo)
-
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिक आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत मान्सूनचा जोर वाढल्याने संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (PTI Photo)
-
शिमला हवामान केंद्राने ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान केंद्राने लोकांना भूस्खलन प्रवण भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. (Photo Source: @rajender11117/instagram)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!