-
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटनेमध्ये आतापर्यंत मृतांची संख्या २७७ वर पोहोचली असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. वायनाडचे माजी खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांची बहीण आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह वायनाडला भेट दिली. (पीटीआय फोटो)
-
गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा या दोघांनीही प्रथम वायनाडच्या भूस्खलनग्रस्त चूरलमला या भागाला भेट दिली. (फोटो: काँग्रेस)
-
राहुल गांधी म्हणाले की, ज्या लोकांनी या दुर्घटनेत कुटुंबातील सदस्य आणि घरे गमावली आहेत अशा लोकांना पाहून मला खूप दुःख झाले आहे, त्यांनी या दुर्घटनेला “राष्ट्रीय आपत्ती” म्हटले आहे आणि तातडीने यावर एका व्यापक कार्ययोजनेची गरज असल्याचे म्हटले आहे. (फोटो: काँग्रेस)
-
“माझे वडिल गेल्यानंतर मला जे वाटले तेचं मला आता वाटत आहे. हे खूप वेदनादायी आहे. या घटनेत या मुलांनी फक्त आपले वडील गमावले नाहीत तर त्यांनी संपूर्ण कुटुंब गमावले आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. प्रियांका म्हणाल्या, की या भागातील लोक ज्या वेदना अनुभवत आहेत ते खूप दुखःद आणि अनाकलनीय आहे. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, राहुल आणि प्रियंका बुधवारीच वायनाडला भेट देणार होते पण खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करण्यात आला. गांधी बहिण भाऊ पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी मदत शिबिरे आणि वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. (फोटो: काँग्रेस)
-
या दरम्यान त्यांनी या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वायनाडमधील सेंट जोसेफ यूपी स्कूलमधील मदत शिबिराला भेट दिली. (पीटीआय फोटो)
-
“या कठीण काळात प्रियांका आणि मी वायनाडच्या लोकांसोबत उभे आहोत. मदत, बचाव आणि पुनर्वसन प्रयत्नांची आम्ही माहिती घेत आहोत. सर्वांनाच मदत करण्याचा प्रयत्न असून यूडीएफ शक्य ती सर्व मदत करण्यास कटिबद्ध आहे.“, असे राहुल गांधी म्हणाले. (फोटो: काँग्रेस)
-
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी २४० लोक बेपत्ता असल्याची पुष्टी केली आहे, तर १५०० हून अधिक लोकांना बाधित भागातून वाचवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. (फोटो: काँग्रेस)
-
दोन दिवसांपूर्वी वायनाड जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलनाच्या घटनेत मृतांची संख्या २७७ वर पोहोचली असून यात २५ लहान मुले आणि ७० महिलांचा समावेश आहे. तर २०० नागरिक जखमी झाले आहेत. (रॉयटर्स फोटो)
-
प्रशासनाकडून मुंडक्काई, वायनाड जिल्ह्यात, विध्वंसक भूस्खलनानंतर बचाव कार्यात जेसीबी तैनात करण्यात आल्या आहेत. (रॉयटर्स फोटो)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य