-
पुण्यात पावसामुळे पूर येऊन गेल्यानंतर आता खड्ड्यांच्या रूपाने रस्ते पुराच्या खुणा वागवत असल्याचे चित्र आहे.
-
थोडा पाऊस झाला, तरी रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने त्यातून वाहने काढणे ही चालकांसाठी कसरतच ठरते आहे.
-
पावसामुळे रस्ते उखडले गेले असून, रस्त्यांचे काम किती निकृष्ट आहे, ते यानिमित्ताने उघडे पडते आहे.
-
रस्ते पावसाने खराब झालेले असताना सोमवारी मुख्यमंत्री येणार म्हणून लगेच ते जाणार त्या मार्गांची डागडुजी झाली.
-
अगदी वाहतूक सुरू असतानाही कर्मचारी खड्डे बुजविण्याचे काम करत होते.
-
पण मंगळवारी रस्त्यांवर पुन्हा ठिकठिकाणी पाण्याची तळी दृष्टीस पडू लागली.
-
नदीत होणारा विसर्ग मंगळवारी कमी झाल्यानंतर नदीपात्रातील रस्ते असे वाहून आलेल्या कचऱ्याने झाकले गेले होते.
-
पूरसदृश परिस्थितीमध्ये केवळ नागरिकच अडकले नाहीत तर, अनेक नागरिकांच्या दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
-
सिंहगड रस्ता परिसरातील पूरसदृश परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून आलेल्या लष्कराच्या जवानांनी आपले कार्य संपताच पुणेकरांचा निरोप घेतला.
-
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकतानगरी परिसराला भेट देऊन पूरस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
-
या वेळी चारचाकी वाहनाच्या टपावर उभे राहून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
-
(सर्व फोटो सौजन्य : पुणे टीम / लोकसत्ता)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा