-
केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यातील दुरुस्तीसंबंधीचे विधेयक संसदेत मांडले, त्यानंतर विरोधी पक्षातील अखिलेश यादव, के.सी. वेणुगोपाल आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेक नेत्यांनी या विधेयकाला विरोध केला, तर जेडीयू आणि टीडीपीने समर्थन केले. वक्फ बोर्डाने देशातील १५०० वर्षे जुन्या मंदिरासह संपूर्ण गाव ताब्यात घेतले होते. असं एक प्रकरण संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत सांगितलं. आपण या प्रकरणासह, वक्फ बोर्डाकडे सर्वात जास्त जमीन कोणत्या राज्यात आहे हे जाणून घेऊया.
-
संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाचा दावा
किरण रिजिजू यांच्या कथेपासून सुरुवात करूया. ही घटना भारतातील दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेंथुराई गावात घडली होती, जी २०२२ मध्ये खूप चर्चेत आली होती. किरेन रिजिजू म्हणाले की, हिंदू लोकसंख्या असलेले हे संपूर्ण गाव वक्फ बोर्डाने वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. परंतु हे गाव १५०० वर्षे जुने आहे. -
गावाकडे होती सर्व कागदपत्रे
जेव्हा तिरुचेंथुराई गावातील लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की त्यांची हजारो वर्षे जुनी वडिलोपार्जित मालमत्ता वक्फ मालमत्ता कशी झाली?. गावातील लोकांकडे जमिनीची सर्व कागदपत्रे होती मात्र वक्फ बोर्डाकडे एकही कागदी पुरावा नव्हता. -
जमीन वक्फ बोर्डाने बळकावल्याचे कसे कळले?
२०२२ मध्ये या गावातील एका व्यक्तीने मुलीच्या लग्नासाठी १.२ एकर जमीन विकण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा तो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजले की ही जमीन विकण्यासाठी त्याला वक्फ बोर्डाकडून एनओसी घ्यावी लागेल. निबंधक कार्यालयाने सांगितले की, गावातील जमिनीवरील मालकी हक्क वक्फ बोर्डाचा आहे, त्यामुळे ही जमीन त्यांच्या परवानगीशिवाय विकता येणार नाही. -
वक्फ बोर्डाने २२० पानांचा खोटा युक्तिवाद केला
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या हिंदू लोकवस्ती असलेल्या गावामध्ये मुस्लिम लोकसंख्येचा इतिहासही नाही. ग्रामस्थांनी डीएमकडे जाऊन त्यांना सांगितले की, गावाचा इतिहास १५०० वर्षांपेक्षा जुना आहे, मग ती वक्फ मालमत्ता कशी असू शकते? सर्व कागदपत्रेही आहेत. प्रकरण वाढत असल्याचे पाहून वक्फ बोर्डाने २२० पानांचा बनावट दस्तऐवज तयार केला आणि असा युक्तिवाद केला की राणी मंगम्मल यांच्या व्यतिरिक्त अनेक स्थानिक राजांनी तिरुचेंथुराईची जमीन वक्फ बोर्डाला भेट म्हणून दिली होती. (अतुल्य भारत/FB) -
वक्फ बोर्डाने बळकावलेल्या मंदिरानेच पर्दाफाश केला
प्रशासनाने याची चौकशी सुरू केली असता वक्फ बोर्डाचे सर्व युक्तिवाद खोटे असल्याचे निष्पन्न झाले. गावात १५०० वर्ष जुने मानेंदियावल्ली समेथा चंद्रशेखर स्वामी मंदिर आहे, मंदिरातील शिलालेखाने वक्फ बोर्डाची संपूर्ण कथा उघड केली. गावातील अनेक एकर जमीन मंदिराच्या मालकीची असल्याचे मंदिराच्या शिलालेखावर लिहिले होते. या जमिनीची मालकी वक्फ बोर्डाकडे कशी पोहोचली हे अद्याप कळू शकलेले नाही. ही बाब चर्चेत आल्यानंतर वक्फ बोर्डाच्या अशाच अनेक घटना उघडकीस आल्या. (दक्षिण भारत/एफबी) -
देशात इतरत्र प्रकरणे
देशातील अनेक भागात वक्फ बोर्डाने सरकारी आणि खाजगी जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केल्याच्या बातम्या आल्या. यानंतर वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्याची मागणी होऊ लागली. (पेक्सेल्स) -
कोणत्या राज्यात सर्वाधिक जमीन आहे
आता कोणत्या राज्यात वक्फ बोर्डाची सर्वाधिक मालमत्ता आहे ते जाणून घेऊ. भारतात सर्वाधिक वक्फ मालमत्ता उत्तर प्रदेशात आहेत. उत्तर प्रदेशातील वक्फ बोर्ड शिया आणि सुन्नी यांच्यात विभागले गेले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाकडे राज्यात १,२४,७३५ वक्फ असून सुन्नी वक्फकडे एकूण २ लाख १० हजार २३९ मालमत्ता आहेत. (पेक्सेल्स) -
उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मालमत्ता
शिया वक्फ बोर्डाकडे ७,२७५ वक्फ आहेत, ज्या अंतर्गत १५,३८६ मालमत्ता आहेत. त्याचबरोबर सुन्नी वक्फ बोर्डाच्या बहुतांश मालमत्ता मुरादाबादमध्ये आहेत. तर लखनौमध्ये शिया वक्फ बोर्डाची सर्वाधिक मालमत्ता आहे. -
देशात वक्फ बोर्डाच्या मालकीची किती जमीन आहे?
रेल्वे आणि कॅथोलिक चर्चनंतर, वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमिनीची मालमत्ता आहे. सध्या वक्फ बोर्डाकडे ८ लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे. वक्फ बोर्डाकडे २००९ पर्यंत ४ लाख एकर जमीन होती, जी काही वर्षांत दुप्पट झाली. २०२३ मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर २०२२ पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण ८ लाख ६५ हजार ६४४ स्थावर मालमत्ता होत्या. (इंडियन एक्सप्रेस)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच