-
शिवसेनेत मोठी फुट निर्माण झाली ती एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे.
-
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असताना अचानक, २० जून २०२२ या दिवशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत गाठले.
-
त्यानंतर शिवसेनेतील बंड उघडे पडले, तर ३० जुन २०२२ रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंतर त्यांनी शिवसेनेवर दावाही केला.
-
दरम्यान संयुक्त शिवसेनेत असताना त्यांनी आतापर्यंत किती विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत, तसेच किती मताधिक्य घेतले होते हे जाणून घेऊयात.
-
२००४ विधानसभा
साल २००४ मध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढले, यावेळी त्यांनी ठाणे मतदारसंघ निवडला होता. या निवडणुकीत त्यांना एकूण २ लाख ३३ हजार मतदान मिळाले. तर ३७ हजार ८७८ इतके मताधिक्य मिळाले. -
२००९ विधानसभा
दुसर्यांदा एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोपरी- पाचपखाडी हा मतदारसंघ निवडला. यावेळी त्यांना एकूण ७३ हजार ५०२ मते मिळाली. तर ३२ हजार ६७६ मतांची त्यांनी आघाडी घेतली होती. -
२०१४ विधानसभा
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती नसतानाही एकनाथ शिंदे यांना १ लाख १४८ मते मिळाली होती. कोपरी- पाचपखाडी मतदारसंघामध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप लेले यांचा पराभव केला होता. -
२०१९ विधानसभा
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडणूक लढवली. ८९ हजार ३०० मताधिक्क्याने त्यांचा विजय झाला. तर एकूण १ लाख १३ हजार मतदान झाले. -
या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस उमेदवार संजय घाडीगावर यांचा पराभव करून सलग चौथा विजय प्राप्त केला. (सर्व फोटो: लोकसत्ता संग्रहित)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य