-
राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे.
-
जुलैअखेरीस कोसळलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे.
-
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा उकाडा वाढला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
-
शहर तसेच उपनगरांत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
-
काही भागात अधूनमधून पाऊससरी कोसळत आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हवा तसा मुसळधार पाऊस पडलेला नाही. यामुळे मुंबईकरांना उकाडा सोसावा लागत आहे.
-
दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील.
-
या कालावधीत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही भागात पाऊस होईल, तर काही भागात कोरडे वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
-
वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारील भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच द्रोणीय स्थिती आहे.
-
याचाच परिणाम म्हणून राज्यात अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागांत हलक्या सरी बरसत आहेत. (सर्व फोटो: लोकसत्ता संग्रहित)

“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”