-
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी देशभरात डॉक्टर संपावर आहेत.
-
दिल्लीपासून मुंबईपर्यंत डॉक्टरांच्या जवळपास सर्वच मोठ्या संघटना आंदोलन करत आहेत.
-
मुंबईत आज सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने केली.
-
मुंबईत BMC, MARD, IMA, IMA, JDN आणि ASMI या डॉक्टरांच्या जवळपास सर्वच मोठ्या संघटनांनी आझाद मैदानात आंदोलन केले.
-
त्याच वेळी, दिल्लीतील एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह शेकडो लोक निदर्शनात सहभागी झाले होते.
-
नवी दिल्लीतील भारतीय आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर डॉक्टर आणि पॅरामेडिक्स एकत्र आले आणि निषेध केला.
-
आंदोलक हातात फलक घेऊन पीडितेला पाठिंबा देताना दिसत होते.
-
आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ती नाईट ड्युटीवर होती.
-
एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूरतेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.
-
यामुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमध्ये एका हत्येवरून खळबळ उडाली आहे.
-
पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी दिल्ली-मुंबई आणि इतर ठिकाणचे डॉक्टर आपला निषेध व्यक्त करत आहेत.
-
निदर्शने करणारे डॉक्टर म्हणाले, डॉक्टर म्हणून आम्ही लोकांचे प्राण वाचवतो पण आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?
-
महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे.
-
आंदोलन आणि निदर्शनादरम्यान पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना श्यामबाजार या आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतले.
-
त्याचवेळी भाजपा नेत्या रुपा गांगुली आणि अग्निमित्रा पॉल धरणे सुरू असताना रस्त्यावरच बसून राहिले.
(एक्स्प्रेस फोटो)

बॉलीवूड अभिनेत्री ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई, १२ वर्षांनी लहान आहे पती, जोडप्याने शेअर केला खास Video