-
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम सध्या ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. इब्राहिम यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अन्वर इब्राहिम हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेले व्यक्तिमत्व आहे. (Pictures: Indian Express- Praveen Khanna)
-
पीएम मोदींनी मोकळ्या मनाने स्वागत केले
अन्वर इब्राहिम राष्ट्रपती भवनात पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. दरम्यान, फरार झाकीर नाईकला भारतात परत आणण्याची मागणीही सोशल मीडियावर होऊ लागली आहे. (Pictures: Indian Express- Praveen Khanna) -
अन्वर इब्राहिम हे नेहमी कोणत्या ना कोणत्या वादांशी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षी एका हिंदू तरुणाच्या धर्मांतरावरून बराच वाद झाला होता त्या प्रकरणातही अन्वर यांचे नाव जोडले गेले होते. एवढेच नाही,तर झाकीर नाईक अन्वर इब्राहिम यांचे निकटवर्तीय असल्याचेही बोलले जाते. (Pictures: Indian Express- Praveen Khanna)
-
हिंदू तरुणांना इस्लाम स्वीकारायला लावले
अन्वर इब्राहिम २०२३ मध्ये मलेशियाचे पंतप्रधान झाले. यानंतर मलेशियातील गौर-मुस्लीम समाज चर्चेत आला. दरम्यान, एका हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारण्याप्रकरणी त्यांचे नाव पुढे आले होते. (Pictures: Indian Express- Praveen Khanna) -
उघडपणे इस्लामचा स्वीकार केला होता
क्लांग येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर एका हिंदू तरुणाला खुलेआम इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर त्यांच्या देशातच नव्हे तर भारतातूही टीका झाली होती. (Pictures: Indian Express- Praveen Khanna) -
तुरुंगातही गेले आहेत
अन्वर इब्राहिम यांनी विद्यार्थीदशेतच राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९० च्या दशकात ते पंतप्रधान होण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते पण नंतर त्यांना अचानक बडतर्फ करून तुरुंगात टाकण्यात आले. (Pictures: Indian Express- Praveen Khanna) -
लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे
१९९८ मध्ये त्यांना भ्रष्टाचार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. या मुद्द्यावरून मलेशियामध्ये प्रचंड निदर्शने झाली आणि अन्वर इब्राहिम लोकांमध्ये आणखी लोकप्रिय झाले. (Pictures: Indian Express- Praveen Khanna) -
दोनदा तुरुंगात गेले
दरम्यान, २००४ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर त्यांच्यावर पुन्हा लैंगिक शोषणाचे आरोप झाले आणि त्यामुळे २०१५ मध्ये त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले. (Pictures: Indian Express- Praveen Khanna) -
झाकीर नाईक जवळ आहे
कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकवर भारतात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. झाकीर नाईकने भारतातून पळ काढल्यानंतर मलेशियामध्ये आश्रय घेतला आहे. नाईकला अनेकवेळा अन्वर इब्राहिम यांच्याबरोबर पाहिले गेले आहे. अशा स्थितीत अन्वर इब्राहिम यांच्या या भारत दौऱ्यावर झाकीर नाईकला भारतात परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Pictures: Indian Express- Praveen Khanna)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”