-
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पीडीपीने आपल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचेही नाव आहे. (Iltija Mufti/Insta)
-
१९९६ मध्ये मेहबुबा मुफ्ती यांनी ज्या जागेवरून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती त्याच जागेवरून आता त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती ही आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहे. (Iltija Mufti/Insta)
-
इल्तिजा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या बिजबिहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. इल्तिजा मुफ्ती किती शिक्षित आहेत हेही जाणून घेऊया. (Iltija Mufti/Insta)
-
इल्तिजा यांचे दोन वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण काश्मीरमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये पुढील शिक्षण घेतले. (Iltija Mufti/Insta)
-
शालेय शिक्षणानंतर, इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेथून राज्यशास्त्रात पदवी घेतली. (Iltija Mufti/Insta)
-
दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती पुढील शिक्षणासाठी यूकेला गेल्या. येथील वॉरविक विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेतले. (Iltija Mufti/Insta)
-
इल्तिजा मुफ्ती यांनी यूकेच्या भारतीय उच्चायुक्तालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील इंडिया इन्स्टिट्यूटमध्येही काम केले आहे. (Iltija Mufti/Insta)
-
कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत असताना इल्तिजा मुफ्ती पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांनी तेंव्हा पक्षाच्या माध्यम सल्लागार म्हणून काम केले होते. (Iltija Mufti/Insta)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”