-
गुजरातमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-
गुजरातमधील वडोदरात दुपारी 2 वाजता विश्वामित्री नदी धोकादायक पाण्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीवर पोहोचली होती.
-
हवामान खात्याने आधीच वडोदरा शहरात पावसासाठी रेड अलर्ट जारी केला होता.
-
हे चित्र वडोदराच्या मुक्तानंद सर्कलचे आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे पाणी साचले आहे.
-
वडोदरातील मांडवी, पाणीगेट, बावामनपुरा, याकूतपुरा अजाबादी मिल या भागातही पूर आला आहे.
-
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 1 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
IMD ने वडोदरा, सुरत, भरूच, नवसारी, वलसाड, अमरेली, भावनगर, आनंद नगर, राजकोट, जामनगर, पोरबंदर, मोरबी, द्वारका आणि कच्छ सारख्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
(EXPRESS PHOTOS BY BHUPENDRA)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच