-
कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देश संतापाने पेटला आहे. दरम्यान, लोकांनी पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारला घेरल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या नबन्ना मोर्चानंतर आता भारतीय जनता पक्षाने १२ तासांसाठी बंगाल बंद पुकारला आहे. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. (PTI)
-
१- नबन्ना मोर्चादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. बंगाल बंदचा परिणाम रस्त्यांवर स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की बुधवारी बंद होणार नाही. सरकारी कर्मचारी कार्यालयात न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (Photo: Indian Express/Partha)
-
२- नबन्ना आंदोलन आणि बंगाल बंद दरम्यान ज्युनिअर डॉक्टरही आज संपावर आहेत. अशा स्थितीत ममता सरकारसमोर एकावेळी तीन आव्हाने आहेत. (Photo: Indian Express/Partha)
-
३- बंगाल बंदमुळे, इंडिगो, विस्तारा आणि स्पाइसजेटसह प्रमुख विमान कंपन्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे उड्डाणे विस्कळीत होण्याचा इशारा दिला. (Photo: Indian Express/Partha)
-
४- पश्चिम बंगालच्या काही भागात बंदचा परिणाम दिसून येत आहे. विशेषत: कोलकाताच्या रस्त्यांवर सामान्य वातावरण नाही. बस, रिक्षा, टॅक्सी यांच्याबरोबरच खासगी वाहनांची संख्याही कमी असल्याचे दिसून आले. (Photo: Indian Express/Partha)
-
५- पश्चिम बंगाल बंदच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, कामगारांनीही रेल्वे रोखली आहे. (PTI)
-
६- पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटापारा येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. भाजपाने टीएमसीवर या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. (Photo: Indian Express/Partha)
-
७- भाटपारा येथे चारचाकी गाडीवर ६ राऊंड गोळीबार झाल्याचा आरोप भाजपा नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. भाटपारा येथील स्थानिक भाजपा नेते प्रियंगू पांडे यांच्या कारवर काही हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. यावेळी कारमध्ये बसलेले भाजपा समर्थक रवी सिंह यांना दुखापत झाली आहे. (Photo: Indian Express/Partha)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश