-
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौ विभागातील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत. या सर्व स्थानकांना आता धार्मिक स्थळे, महापुरुष आणि आध्यात्मिक गुरूंची नावे देण्यात येणार आहेत. ही स्थानके कोणती आहेत ते जाणून घेऊ. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
1- कासिमपूर हॉल्ट आता जायसी स्टेशन
कासिमपूर हॉल्ट स्टेशनचे नाव आता जायसी सिटी असे करण्यात आले आहे. वास्तविक, जायसी हे अमेठीमधील एक शहर आहे. या ठिकाणी पद्मावत महाकाव्याचे लेखक मलिक मोहम्मद जायसी राहत होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
2- पूर्वीचे मिश्रौली आता मां कालिकन धाम स्टेशन
यूपीचे मिश्रौली स्टेशन आता त्याचे कालिकन धाम स्टेशन या नावाने ओळखले जाईल. अमेठीच्या संग्रामपूर ब्लॉकमध्ये असलेल्या माँ कालिकन धाम शक्तीपीठाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. येथे असलेल्या तलावात स्नान केल्याने डोळ्यांशी संबंधित आजार दूर होतात अशी आख्यायीका आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
3- पूर्वीचे जायस रेल्वे स्टेशन आता गुरु गोरखनाथ स्टेशन.
जायस रेल्वे स्थानकाचे आता गुरु गोरखनाथ स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये नाथ संप्रदायाचे पहिले योगी गुरु गोरखनाथ यांचेही मंदिर आहे, ज्याचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
4- पूर्वीचे अकबरगंज आता अहोर्व भवानी धाम स्टेशन
रायबरेली येथील अकबरगंज रेल्वे स्थानक आता अहोर्व भवानी धाम म्हणून ओळखले जाणार आहे. दरम्यान, अमेठीमध्ये माँ अहोर्व भवानी धाम मंदिर देखील आहे, असे म्हटले जाते की या मंदिराची स्थापना पांडवांनी केली होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
5- पूर्वीचे फुरसातगंज रेल्वे स्टेशन आता तपेश्वर धाम
अमेठीतील फुरसतगंज रेल्वे स्थानकाला आता तपेश्वर धाम असे नाव देण्यात आले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
6- बानी रेल्वे स्टेशन आता ते स्वामी परमहंस स्टेशन म्हणून ओळखले जाईल. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
7- निहालगड आता महाराजा बिजली पासी स्टेशन
अमेठीच्या निहालगड स्टेशनचे नावही बदलण्यात आले आहे. हे स्टेशन आता महाराजा बिजली पासी स्टेशन म्हणून ओळखले जाईल. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
8- परिसगंज हाल्ट आता शहीद भाले सुलतान म्हणून ओळखले जाईल. देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हुतात्मा भाले सुलतान यांनी इंग्रजांचा सात वेळा पराभव केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश