-
नारायण राणेंच्या अटकेची मागणी शिवसेना उबाठाने केली आहे. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
काल (२८ ऑगस्ट) मालवणमध्ये झालेल्या गदारोळानंतर आज शिवसेना उबाठाने ही मागणी केली आहे. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
पुण्यामध्ये आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या घोषणा देण्यात आल्या. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
“नारायण राणे खुलेआम पोलिसांवर अरेरावीची भाषा वापरतात, ठोकून काढण्याची काढण्याची धमकी देतात, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा,” अशी मागणी या आंदोलनात सुषमा अंधारेंनी केली आहे. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
शांतता भंग केल्याने राणेंना अटक करावी, मीडीयाचा बूम ओढणे, पत्रकारांना दमदाटी करणे, कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी गृहमंत्र्यांचा पाठींबा असल्याचा आरोप यावेळी सुध्मा अंधारे यांनी केला. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
दरम्यान, काही दिवसांआधी सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
त्यानंतर त्या प्रकरणावर विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण झाले होते. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)
-
काल काय घडले?
दरम्यान, या प्रकरणावरून काल मविआ आणि महायुती आमनेसामने आल्याचे काल पाहायला मिळाले. मविआचे नेते आदित्य ठाकरे आणि राणे समर्थक यांच्यात मालवणमध्ये स्मारक असलेल्या ठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मालवणमध्ये आदित्य ठाकरे पाहणीसाठी गेले असताना, भाजपचे नारायण राणे आणि शिवसेना उबाठाचे आदित्य ठाकरे समोरासमोर आले होते. (Express Photo By Pavan Khengre,29.08.24,Pune)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य