-
जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी काल (४ सप्टेंबर) प्रचारसभेत बोलत होते.
-
श्रीनगरपासून ७५ किमी अंतरावर दुरु येथील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. दुरु मतदारसंघातून काँग्रेस सरचिटणीस जी.ए.मिर हे रिंगणात आहेत.
-
जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देणे ही देशवासीयांची सामूहिक जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला नाही तर, इंडिया आघाडी केंद्रात सत्तेत आल्यावर पहिला निर्णय राज्याचा दर्जा देण्याबाबतचा घेईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
-
विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य दर्जा द्यावा अशी आमची मागणी होती, तर भाजपला निवडणुकीनंतर हा निर्णय घ्यायचा आहे. – राहुल गांधी
-
जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार हे निश्चित. जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन जनतेचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप राहुल यांनी केला.
-
हा येथील जनतेवर अन्याय आहे. जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांचे वर्तन २१व्या शतकातील राजासारखे असल्याचा टोला राहुल यांनी लगावला.
-
तसेच बाहेरील नागरिकांना सारे लाभ मिळत असल्याचा दावा राहुल यांनी केला.
-
निवडणूक आयोग, नोकरशाही तसेच माध्यमांवर नियंत्रण असल्याची नाराजी राहुल यांनी व्यक्त केली.
-
सत्तेत येण्याचा विश्वास
जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी संगल्डन येथील सभेत केला. -
रामबन जिल्ह्यात बनिहल मतदारसंघाचा हा भाग आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विकास रसून वाणी येथून रिंगणात आहे.
-
नॅशनल कॉन्फरन्सने सजाद शाहीन यांना उमेदवारी दिली असून, भाजपने सलीम भट यांना संधी दिली आहे.
-
येथे काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे.
-
(सर्व फोटो: लोकसत्ता संग्रहित)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”