-
विधानसभा निवडणुकीत संख्याबळानुसारच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिले.
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रवेश करणाऱ्यांची छाननी करूनच यापुढे प्रवेश दिला जाणार आहे, असेही पवार यांनी एका प्रश्नावेळी सांगितले.
-
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत.
-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीने निवडणुकीआधी मुख्यमंत्री ठरवावा; त्याला माझी संमती असेल, असे विधान केले होते.
-
ठाकरे यांच्या विधानाकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, की “१९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोणताही चेहरा नसताना जनतेने मतदान केले होते. मुख्यमंत्रिपदापेक्षा राज्यातील जनतेला स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे.”
-
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेवर बोलताना पवार म्हणाले, की या पुतळ्याचे काम दिलेल्या शिल्पकाराने इतके मोठे काम यापूर्वी कधीही केलेले नव्हते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाऱ्याचा वेग वाढल्याचे कारण सांगत असले, तरी ते रास्त नाही. -शरद पवार
-
या विरोधात मुंबईत आम्ही आंदोलन केले. -शरद पवार
-
त्यावर आम्ही राजकारण करत असल्याची टीका होत असली तरी ती निरर्थक आहे, असे पवार म्हणाले. (Photos: Sharad Pawar/Facebook)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”