-
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज टेक्सासमधील डॅलस येथे पोहोचले. त्यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा आजपासून सुरू होत आहे.
-
या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या महिन्यात अमेरिकेला भेट देणार आहेत अशा वेळी राहुल गांधी हा दौरा करत आहेत.
-
यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि सहकारी भारतीयांनी विमानतळावर राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले.
-
दरम्यान तिथे पोहोचल्यानंतर सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी व्यक्त झाले आहेत.
-
फेसबुकवरील एका पोस्टमध्ये गांधी म्हणाले, “मी या दौऱ्या दरम्यान अर्थपूर्ण चर्चा आणि व्यावहारिक संवाद साधण्यास उत्सुक आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.” आपल्या दौऱ्यात गांधी वॉशिंग्टन डीसी आणि डॅलसमध्ये अनेक चर्चा करतील. यावेळी ते टेक्सास विद्यापीठालाही भेट देणार आहेत.
-
ते स्थानिक भारतीय समुदाय आणि काही ‘टेक्नोक्रॅट्स’नाही भेटणार आहेत. डॅलसमधील नेत्यांसोबत डिनरही करणार आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांच्या मते, ते वॉशिंग्टन डीसीलाही भेट देतील, जिथे त्यांची विविध लोकांशी चर्चा करण्याची योजना तयार आहे. अशी माहिती ३१ ऑगस्ट रोजी सॅम पित्रोदा यांनी दिली होती.
-
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड येथील नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियम येथे एका विशाल सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
(Photos: Rahul Gandhi/Facebook)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स