-
हरियाणातील जुलाना मतदारसंघातील विधानसभा निवडणूक खूपच रंजक ठरत आहे. कुस्तीच्या दुनियेतून राजकारणात आलेली विनेश फोगट काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. (Photo- ANI)
-
तिचा सामना भाजपाचे योगेश बैरागी आणि आम आदमी पक्षाच्या कविता देवी दलाल यांच्याशी आहे.
-
कविता दलाल आणि विनेश फोगट या दोघींचाही खेळाशी संबंध आहे. तर भाजपाचे उमेदवार योगेश कुमार एअर इंडियामध्ये काम करायचे. या तिघांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. (Photo- Kavita Dalal Facebook)
-
गेल्या दशकापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेश फोगटकडे कार, सोने, रोखे, बँक खाती इत्यादींसह एकूण जंगम मालमत्ता आहे, जी सुमारे १.१० कोटी रुपये इतकी आहे. (Photo- ANI)
-
कविता यांच्याकडे ५ लाख ८२ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. याशिवाय पतीच्या नावावर ३२ लाख रुपयांचा फ्लॅट आहे. एक कार आहे आणि तीही पतीच्या नावावर आहे. कविता यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.
-
कविताबद्दल बोलायचे तर त्यांच्याकडे ७० हजार रुपये रोख आहेत. त्यांच्या बँक खात्यात जवळपास २६ हजार रुपये आहेत. (Photo- Kavita Dalal Facebook)
-
तर ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचे सोने आणि १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आहेत. (Photo- Kavita Dalal Facebook)
-
कॅप्टन योगेश यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे १ कोटी १५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ७ कोटी २७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. योगेश यांच्या पत्नीकडे ३३ लाख १७ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. (Photo- Yogesh Bairagi X)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल