-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा जाहीर केला आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, जोपर्यंत जनता मला पुन्हा निवडून देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.” (REUTERS Photo)
-
तुमचा निर्णय येईपर्यंत मी जबाबदारी घेणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले. दरम्यान आम आदमी पक्षाचा दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल, ही घोषणा त्यांच्या समर्थकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे, कारण हे पाऊल दिल्लीच्या राजकारणाला मोठे वळण देणारे ठरू शकते. (PTI Photo)
-
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. (PTI Photo)
-
दरम्यान, देशात एकूण २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार वेगळा असतो. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन त्या राज्याच्या विधानसभेद्वारे ठरवले जाते. तर दर दहा वर्षांनी पगार वाढतो. (PTI Photo)
-
मुख्यमंत्र्यांना केवळ मुख्यमंत्री म्हणून पगार मिळत नाही, तर ते विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही पगार घेतात. राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित केलेले आहेत. (PTI Photo)
-
म्हणजेच त्यांच्या पगारात महागाई भत्ता आणि इतर भत्ते समाविष्ट केले जातात. याशिवाय मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत मिळतात. याशिवाय त्यांना सरकारकडून कार आणि सुरक्षाही दिली जाते. (PTI Photo)
-
delhiassembly.delhi.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल सांगायचे तर, त्यांना दरमहा ३ लाख ९० हजार रुपये दिले जातात. (PTI Photo)
-
म्हणजेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वार्षिक वेतन 46 लाख 80 हजार रुपये इतके आहे. (PTI Photo)
बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण