-
आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले होते, ज्यावर सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली. अशा स्थितीत आतिशी मार्लेना आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. आतिशी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या उच्च महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. अनेक बड्या चेहऱ्यांनी या कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. आज आपण जाणून घेऊया त्या 10 टॉप सीईओंबद्दल ज्यांनी येथून शिक्षण घेतले आहे. (Photo- Indian Express)
-
आतिशी यांनी आपले सुरुवातीचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल्स स्कूल (पुसा रोड), दिल्ली येथून केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सर्वोच्च महाविद्यालयांपैकी एक असलेल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात पदवी घेतली. यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या आणि तिथून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सेंट स्टीफन्स कॉलेजबद्दल सांगायचे तर, देशातील अनेक टॉपच्या सीईओंनी येथूनच शिक्षण घेतले आहे. (Photo- Indian Express)
-
1- अजयपाल सिंग बंगा
भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेस एक्झिक्युटिव्ह अजयपाल सिंग बंगा हे सध्या वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष आहेत. याआधी त्यांनी मास्टरकार्डचे सीईओ म्हणून काम केले होते. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स केले आहे. (Photo- Indian Express) -
2- मनीषा गिरोत्रा
मोएलिस अँड कंपनी इंडियाच्या सीईओ मनीषा गिरोत्रा यांनीही दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. (मनिषा गिरोत्रा/ट्विटर) -
3- पियुष गुप्ता
पियुष गुप्ता हे भारतीय वंशाचे सिंगापूरचे बँकर आहेत आणि सध्या DBS समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. डीबीएस बँक ही दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठी बँक आहे. यासोबतच पियुष गुप्ता हे इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्सचे उपाध्यक्ष आणि एंटरप्राइज सिंगापूरचे बोर्ड सदस्य आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. (Photo- Indian Express) -
4- दीप कालरा
भारतीय उद्योगपती दीप कालरा हे भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी MakeMyTrip चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दीप कालरा यांनी 1990 मध्ये सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए केले. (Photo- Indian Express) -
5- सिद्धार्थ लाल
1994 मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए केलेले सिद्धार्थ लाल हे एक भारतीय उद्योगपती आहेत. सिद्धार्थ लाल हे आयशर मोटर्सचे माजी सीईओ आणि सध्या आयशर गुडअर्थ लिमिटेडचे संचालक आणि VE कमर्शिअल व्हेईकल्सचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. (Photo- Indian Express) -
६- शिविंदर मोहन सिंग आणि मालविंदर मोहन सिंग
भारतीय उद्योगपती शिविंदर मोहन सिंग आणि त्यांचे भाऊ मालविंदर मोहन सिंग हे फोर्टिस हेल्थकेअर आणि रेलिगेअरचे संस्थापक आहेत. मात्र, दोन्ही भाऊ सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. शिविंदर आणि मलविंदर या दोघांनीही दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. मालविंदर मोहन सिंग यांनी या कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे आणि त्यांचे भाऊ शिविंदर मोहन सिंग यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून गणित विषयात बीए ऑनर्सचे शिक्षण घेतले आहे. (Photo- Indian Express) -
७- जनमेजय सिन्हा
जन्मेजय कुमार सिन्हा हे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) इंडियाचे विद्यमान अध्यक्ष, BCG फेलो आणि हेंडरसन इन्स्टिट्यूट इनोव्हेशन साउंडिंग बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात बीए आणि एमए केले आहे. (Photo- Indian Express) -
8- गौतम थापर
गौतम थापर हे एक भारतीय उद्योगपती आहेत जे अवंथा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. गौतम थापर यांनीही दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. (Photo- Indian Express) -
9- अशोक वेमुरी
भारतीय-अमेरिकन व्यवसाय कार्यकारी अशोक वेमुरी हे Conduent आणि iGate चे माजी CEO आहेत. सध्या, ते क्रोगर येथे आर्थिक धोरण आणि सार्वजनिक जबाबदारीच्या संचालक पदावर आहेत. अशोक वेमुरी यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून भौतिकशास्त्रात बी.ए. केले आहे. (Photo- Wikipedia) -
10- विक्रम तलवार
EXL सर्व्हिसेसचे सह-संस्थापक भारतीय उद्योगपती विक्रम तलवार यांनीही सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. (Photo- LinkdIn) ( हे देखील वाचा: Atishi Marlena : फुल स्लीव्ह ब्लाउज आणि कॉटन साडी, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा अप्रतिम क्लासी लूक, पाहा फोटो

Raj Thackeray : महाकुंभमेळ्यातून नांदगावकरांनी आणलं गंगेचं पाणी; राज ठाकरे म्हणाले, “हड… आताच करोना गेलाय…”