-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत.
-
पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकसकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
-
यावेळी पंतप्रधानांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
-
या सभेला वर्ध्यातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला.
-
प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली.
-
दरम्यान, भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेत केली. नमस्कार म्हणत त्यांनी जनतेशी संवादास सुरुवात केली.
-
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.
-
त्याचवेळी त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.
-
काँग्रेससह राज्यातील मविआवर त्यांनी हल्ला चढवला.
-
राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबावर शाही परिवार अशी टीका करताना काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
-
राज्यातील मविआ आघाडीवर बोलताना मोदींनी जनतेला आवाहन केले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ देऊ नका.
-
यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Photos: Narendra Modi/X)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य