-
हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात सतत गदारोळ सुरू आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि सिरसाच्या खासदार कुमारी सेलजा सध्या चर्चेत आहेत. त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्षात कुमारी शैलजा यांचा अपमान झाला असून आम्ही त्यांना आमच्यासोबत घेण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच मनोहर लाल खट्टर यांनी कुमारी शैलजा यांना शिवीगाळ देखील करण्यात आली होती आणि सध्या त्या घरी बसून आहेत, असेही सांगितले आहे.
-
कुमारी शैलजा या खूप श्रीमंत नेत्या आहेत
दरम्यान, कुमारी शैलजा यांनी हरियाणाच्या निवडणूक प्रचारापासून अंतर ठेवले आहे आणि सोशल मीडियावरही सक्रिय नाहीत. अशा स्थितीत त्याच्याबाबत विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. आता काँग्रेस कुमारी शैलजा यांना मनवण्यात यशस्वी होणार की त्या अन्य पक्षात प्रवेश करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कुमारी शैलजा या खूप श्रीमंत नेत्या आहेत. हरियाणात त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडील मालमत्तेबद्दल जाणून घेऊयात. -
वडील होते खासदार
कुमारी शैलजा यांचे वडील चौधरी दलबीर सिंग हे देखील काँग्रेस नेते होते आणि कॅबिनेट मंत्रीही राहिले होते. यासोबतच ते सिरसा मतदारसंघाचे माजी खासदार होते. -
एफडी
या वर्षी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुमारी शैलजा यांनी दिलेल्या मालमत्तेचा तपशील myneta.info वेबसाइटवर उपलब्ध आहे. या वेबसाइटनुसार त्यांच्याकडे दोन लाख रुपये रोख आहेत. यासोबतच बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये 7 कोटी 19 लाख रुपये जमा आहेत, त्यापैकी केवळ 6,72,00,000 रुपये एफडी आहेत. -
दागिने, रोखे आणि शेअर्स
कुमारी शैलजा यांनी बॉण्ड्स, डिबेंचर्स आणि कंपन्यांमधील शेअर्समध्ये 2,35,09,285 रुपये गुंतवले आहेत. त्याच्याकडे फक्त होंडा सीटी कार आहे जीची किंमत अंदाजे 9 लाख रुपये आहे. शैलजा कुमारी यांच्याकडे सुमारे 44 लाख रुपयांचे दागिने आहेत. -
प्रॉपर्टीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे
कुमारी शैलजा यांनी प्रॉपर्टीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. हरियाणातील हिसार येथे त्यांच्याकडे 4 कोटी 45 लाख रुपयांची शेतजमीन आहे. यासोबतच सोनीपतमध्ये 7 कोटी 50 लाख रुपयांची शेतजमीन आहे. कुमारी शैलजा यांच्याकडे हरियाणामध्ये 11,25,56,548 रुपयांच्या अनेक बिगरशेती जमिनी आहेत. -
घराची किंमत
याशिवाय कुमारी शैलजा यांच्याकडे 3 कोटी 30 लाख रुपयांची दोन निवासी घरे आहेत. याशिवाय त्यांना वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. कुमारी शैलजा यांच्या या सर्व मालमत्ता हरियाणातील हिसार, सिरसा, पानीपथ, फरीदाबाद ते गुरुग्राम येथे आहेत. -
नेट वर्थ आणि शिक्षण
myneta.info नुसार कुमारी शैलजाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे एकूण 42 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांनी 1987 मध्ये पंजाब विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.फिल केले आहे. -
(सर्व फोटो- इंडियन एक्सप्रेस)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य