-
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच आतिशी यांनी जे पाऊल टाकले त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (PTI Photo)
-
दरम्यान, आतिषी राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेसच्या प्राचीन हनुमान मंदिरात पोहोचल्या आणि त्यांनी संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिरात जल अर्पण केले, पूजा केली आणि हनुमान चालिसाचे पठण केले. (Photo: AtishiAAP/twitter)
-
आतिशी यांच्या या कृतीमुळे त्या अरविंद केजरीवाल यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे बोलले जात आहे. केजरीवाल प्रत्येक शुभ प्रसंगी आणि महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी हनुमान मंदिरात जातात. अण्णांच्या आंदोलनापासून ते दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात ते प्रत्येक वेळी हनुमान मंदिरात गेलेले आहेत. (Photo: AtishiAAP/twitter)
-
आतिशी यांनी या दर्शनाचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर ही छायाचित्रे शेअर करताना देवाकडे काय प्रार्थना केली हेही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. (Photo: AtishiAAP/twitter)
-
आतिशी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “कनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमानजींचे आशीर्वाद घेतले. गेल्या दोन वर्षात आम आदमी पार्टी, दिल्ली सरकार, दिल्लीची जनता आणि आमचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अनेक कट रचले गेले. पण हनुमानजींनी प्रत्येक संकटापासून आमचे रक्षण केले. (Photo: AtishiAAP/twitter)
-
त्यांनी पुढे लिहिले, “संकट मोचन यांना माझी प्रार्थना आहे की त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहोत, आम्ही दिल्लीच्या लोकांसाठी काम करत राहू आणि येत्या निवडणुकीनंतर अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनतील.” (PTI Photo)
-
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी २१ सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत पाच कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. (पीटीआय फोटो)
-
राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी राज्याच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. (Photo: AtishiAAP/twitter)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…