-
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर गटाच्या (Senate) अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने (Yuva Sena) पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करत दहा पैकी नऊ जागांवर विजय प्राप्त केला आहे.
-
दहाव्या जागेची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
-
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (Akhil Bhartiya Vidyarthi Parishad) पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
-
मतदार नोंदणी व मतदार यादीवर आक्षेप, आरोप-प्रत्यारोप, न्यायालयातील लढाई, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, एका वर्षात निवडणुकीला दुसऱ्यांदा दिलेली स्थगिती आदी कारणांमुळे ही निवडणूक चर्चेची ठरली होती.
-
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी मंगळवार, २४ सप्टेंबरला मतदान पार पडले होते.
-
त्यानंतर फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी पार पडली.
-
आज युवा सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून पेढे वाटून आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
-
ठाकरे गटाच्या युवा सेनेचे राखीव प्रवर्गातील जागा असणाऱ्या अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातून शीतल शेठ – देवरुखकर, अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून डॉ. धनराज कोहचाडे, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती (डीटी – एनटी) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी) प्रवर्गातून मयूर पांचाळ, महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले.
-
तर खुल्या प्रवर्गातीलही पाच जागांवर युवा सेनेने विजय संपादन केला. खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, अॅड. अल्पेश भोईर, मिलिंद साटम, परमात्मा यादव यांनी दणदणीत विजय मिळवला.
-
फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे/X आणि Express Photo By Sankhadeep Banerjee

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश