-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे अधिक जोमाने वाहू लागले आहे.
-
अशातच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ हजार २४० कोटींच्या काही प्रकल्पांचे लोकार्पण तर काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले.
-
पुण्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान दूरदृश्यप्रणालीमार्फत उपस्थित होते.
-
या वेळी यापूर्वीच्या सरकारची जुनी कार्यपद्धती आणि मानसिकतेमुळे शहरांचा विकास खुंटल्याची टीका करतानाच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘डबल इंजिन’ सरकारमुळे विकासाला गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
-
पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर-मेट्रो या भुयारी मार्गाचे लोकार्पण तसेच स्वारगेट-कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.
-
पुण्यातील भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, सोलापूर विमानतळ, बिडकीन औद्याोगिक क्षेत्र अशा ११ हजार २४० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.
-
या वेळी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पुण्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता शहरासाठी यापूर्वीच मेट्रोची आवश्यकता होती, असा दावा केला.
-
यापूर्वीच्या सरकारकडे नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.
-
पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. सातत्यामध्ये कोणताही अडथळा आला की राज्याचे नुकसान होते. पुण्यासह राज्यातील अन्य शहरांबाबत हाच प्रकार घडला. मात्र ‘विकसित महाराष्ट्र विकसित भारत’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
-
भविष्याच्या दृष्टीने पायाभूत सेवा-सुविधा आणि विकासाचे लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविणे राज्याच्या हिताचे आहे. समाजात बदल घडविण्याची जबाबदारी महिलेकडे येते तेव्हा कशी क्रांती होते, हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून देशाने पाहिले आहे.
-
मात्र, महिलांबाबतही यापूर्वीच्या सरकारची मानसिकता चुकीची होती. पायाभूत सुविधांअभावी मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. सैनिक शाळा, लष्करात मुलींना प्रवेश नव्हता. गरोदरपणाची सुट्टीही महिलांना मिळत नव्हती. ही जुनी मानसिकता भाजप सरकारने पूर्णपणे बदलली आहे. सर्व क्षेत्रात महिलांना संधी देत देशाच्या विकासाचे दरवाजे उघडले असल्याचे मोदी म्हणाले.
-
दरम्यान या कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मेट्रोच्या सफरचा आनंद घेतला.
(सर्व फोटो अजित पवार, देवेंद्र फडणवीस फेसबुक पेजवरून साभार)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य