-
काल २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५५ वी जयंती होती, जयंतीनिमित्त महात्मा गांधींचे संपूर्ण देशाने स्मरण केले. जागोजागी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करून आदर व्यक्त केला आणि त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर एका विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींशिवाय देश-विदेशातील अनेक नेते आणि मान्यवर सहभागी झाले होते. (पीटीआय फोटो)
-
राजघाटावरील भिक्षूंनीही महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
या खास प्रसंगी जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
जमैकाच्या पंतप्रधानांसोबत माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलनेही राजघाट गाठून महात्मा गांधींबद्दल आदर व्यक्त केला. (पीटीआय फोटो)
हेही वाचा- महात्मा गांधींचा आहार कसा होता? बापू ‘या’ स्वदेशी गोष्टी आवडीने खायचे!

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO