-
हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी २०२४ मध्ये माजी खासदार अशोक तंवर यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तासाभरापर्यंत ते भाजपच्या उमेदवारांसाठी रॅली काढत होते. अशा परिस्थितीत अशोक तन्वर कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे जाणून घेऊया. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अशोक तंवर हे हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्याशी मतभेद झाल्याने तन्वर यांनी पक्ष सोडला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर, तन्वर यांनी २०२१ मध्ये ममता बॅनर्जींच्या पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु ते तिथेही रमले नाहीत आणि नंतर २०२२ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टी (आप) मध्ये प्रवेश केला. या वर्षाच्या सुरुवातीला (२०२४) त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र आता त्यांनी पुनरागमन करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
myneta.info वेबसाइटनुसार, २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, त्यांची एकूण संपत्ती ६ कोटी ४४ लाख रुपये आहे. त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांत ५ लाखांच्या ठेवी आहेत. त्याचवेळी बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये २ लाख ४८ हजार रुपये जमा आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
याशिवाय अशोक तंवर यांनी रोखे, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये १ लाख ४८ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. ४४ लाख ९० हजार रुपयांच्या एलआयसी आणि इतर विमा पॉलिसी घेतल्या आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अशोक तंवर आणि त्यांच्या पत्नीकडे ६४ लाख ८४ हजार रुपयांचे दागिने आहेत. याशिवाय अशोक तंवर यांनी बरीच रक्कम विविध ठिकाणी गुंतवली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर अशोक तंवर हे खूप शिकलेले नेते आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहासात एम.ए., एम.फिल आणि पीएच.डी. केली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अशोक तंवर यांच्या नावावर राजस्थानमध्ये एक शेतजमीन आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर हरियाणामध्ये शेतजमीन आहे. या दोन्हीची किंमत २ कोटी रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अशोक तंवर आपल्या कुटुंबासह राहत असलेल्या हरियाणातील घराची सध्याची किंमत ३ कोटी २५ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे एकूण ५ कोटींची मालमत्ता आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य