-
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे केले आहे. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
त्यांनी आपल्या कुटुंबासह नवी दिल्ली विधानसभेजवळ असलेल्या बंगल्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
केजरीवाल आपल्या कुटुंबासह नवी दिल्ली विधानसभेत राहणार आहेत. ते या भागातील आमदार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
नवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच त्यांनी सर्व सरकारी सुविधा सोडण्याची घोषणा केली होती. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
ते २०१५ पासून फ्लॅग स्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थानात राहत होते, ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
आता केजरीवाल लुटियन्स दिल्लीतील फिरोजशाह रोडवरील बंगला क्रमांक ५ मध्ये शिफ्ट झाले आहेत. या नवीन निवासस्थानात केजरीवाल त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल, आई-वडील आणि दोन्ही मुलांसोबत राहणार आहेत. (PTI Photo)
-
दरम्यान, हा बंगला पंजाबचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांचे अधिकृत निवासस्थान आहे, जो मंडी हाऊसजवळ आहे. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
अशोक मित्तल आणि त्यांच्या पत्नीने केजरीवाल कुटुंबाचे त्यांच्या घरी स्वागत केले. (Photo Source: Aam Aadmi Party – Delhi/Facebook)
-
केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे केल्याची छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात ते कुटुंबासह दिसत आहेत. (PTI Photo)
हेही वाचा- भारतीय संघातील ‘हा’ क्रिकेटर आयकर विभागात आहे इन्स्पेक्टर; बुद्धिबळपटूही होता, वाचा माहिती
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?