-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, ५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ चे उद्घाटन केले आहे.
-
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या १२.५ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विकास कामांच्या लोकार्पण, पायाभरणी कार्यक्रमात करण्यात आले.
-
तसेच त्यांनी प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव सोपा करण्यासाठी निर्मित केलेले MetroConnect3 ॲपही लॉन्च केले.
-
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधानांनी बीकेसी – सांताक्रुझ मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवास केला.
-
यावेळी त्यांच्याबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मजूर आणि विद्यार्थी होते.
-
पंतप्रधानांनी भुयारी मेट्रो सफरीदरम्यान या सर्वांशी संवाद साधला.
-
आरे – बीकेसी टप्प्यातील मेट्रो स्थानके
आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी २, सहार रोड, विमानतळ टी २, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत, बीकेसी. -
तिकीट दर असे
आरे जेव्हीएलआर – सीप्झ – १० रुपये
आरे जेव्हीएलआर – एमआयडीसी, मरोळ – २० रुपये
आरे जेव्हीएलआर – सहार रोड, विमानतळ टी १ – ३० रुपये
आरे जेव्हीएलआर – सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत – ४० रुपये
आरे जेव्हीएलआर – बीकेसी – ५० रुपये -
१० ते ७० रुपये दर
आरे जेव्हीएलआर – कफ परेड तिकीट दर ७० रुपये
(Photos: Narendra Modi/X)

‘पहलगाम हल्ल्यामागे भाजपा सरकारचा हात’, आमदार अमिनूल इस्लाम यांचे वादग्रस्त विधान; आसाम पोलिसांनी केली अटक