-
‘टाटा’ (TATA) या नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्याोग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे द्रष्टे उद्याोगपती, दानवीर, टाटा उद्याोगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
-
रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. आपल्या प्रकृतीस धोका नसल्याचे त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर जाहीर केले होते.
-
परंतु बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालविल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी निवेदनाद्वारे जाहीर केली.
-
रतन टाटा हे मुंबईमधील (Mumbai) बॉम्बे हाऊस (Bombay House) येथे राहत होते.
-
रतन टाटा यांना कुत्र्यांबद्दल प्रचंड प्रेम होते.
-
अनेक प्राणी मित्र संघटनांना त्यांनी नेहमी मदत केली होती.
-
त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्येही जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत.
-
एकदा रतन टाटा यांना सोशल मीडियावर कुत्र्यांबरोबरचे काही खास क्षण शेअर केले होते.
-
यापैकी ‘गोवा’ (Goa Dog) हा कुत्रा खूप खास आहे कारण तो मला ऑफिसमध्येही सोबत करतो, असे रतन टाटांनी म्हटले होते.
-
रतन टाटा यांनी कुत्राचं नाव ‘गोवा’ ठेवण्यामागील गोष्ट सांगितली होती.
-
“माझा एक सहकारी गोव्यावरुन त्याच्या कारने मुंबईला येत असताना रस्त्यावरील एक छोटं कुत्र्याचं पिल्लू त्याच्या गाडीमध्ये चढलं आणि ते थेट बॉम्बे हाऊसपर्यंत आलं. त्यामुळेच त्याचं नाव गोवा असं ठेवलं आहे”.
-
समस्त टाटा कुटुंबियांना बॉम्बे हाऊसमधील या कुत्र्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रतन टाटा/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”