-
Ratan Tata Passes Away: टाटा उद्याोगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (०९ ऑक्टोबर) रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.
-
रतन टाटा यांचे वडील नवल टाटा (Naval Tata) हे नवाजबाई टाटा (Navajbai Tata) आणि रतनजी टाटा (Ratanji Tata) यांचे दत्तक पूत्र होते.
-
रतन टाटा हे अवघे १० वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला.
-
त्यानंतर १९४० पासून रतन टाटा यांच्या आजीनेच त्यांचा संभाळ केला.
-
टाटा स्टील्समध्ये रतन टाटा यांना पहिल्यांना नोकरी मिळाली तेव्हा चुनखडी आणि स्फोट भट्टीची जबाबदारी देण्यात आली होती.
-
१९६१ साली त्यांनी टाटा कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
२००७ साली रतन टाटा हे पहिले सामान्य भारतीय ठरले होते ज्यांनी एफ-१६ फाल्कन हे विमान उडवले होते.
-
एका अमेरिकन वैमानिकाबरोबर सहवैमानिक म्हणून रतन टाटांनी ४० मिनिटे हे विमान उडवले होते.
-
हा कारनामा त्यांनी अरो इंडिया शोमध्ये केला होता.
-
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समुहाने काही मोठ्या कंपन्या विकत घेऊन जगभरामध्ये आपला विस्तार केला.
-
हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधील एका इमारतीला रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे.
-
रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
-
सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
-
रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४ च्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रतन टाटा/इन्स्टाग्राम)
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”