-
काल (१२ ऑक्टोबर) दसरा होता.
-
त्यानिमित्ताने राज्यात प्रचंड प्रसिद्ध असलेले दसरा मेळावे पर पडले.
-
शिवसेना पक्षाचा (शिंदे गट) दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.
-
यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
-
यावेळी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.
-
पक्षाच्या विभाजनानंतर शिवसेनेचा हा दूसरा दसरा मेळावा होता.
-
पक्षाचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना.
-
या फोटोमध्ये एकनाथ शिंदे, रामदास कदम, आणि नीलम गोऱ्हे दिसत आहेत.
-
दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली.
-
त्याचबरोबर महायुती सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला.
-
महाविकास आघाडीवरही त्यांनी जोरदार टीका केली.
-
गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडके सरकार झाले आहे. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती, त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेवर होणाऱ्या अन्याया विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. – एकनाथ शिंदे
-
तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला. अशा लोकांबरोबर बाळासाहेब कधीही राहिले नसते. बाळासाहेबांची सगळी स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.
-
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. त्यामुळे आज आझाद मैदानात होणारा हा खऱ्या शिवसेनेचा आझाद मेळावा असल्याचे सांगत शिंदे यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले.
-
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला. देशात आपले राज्य तिसऱ्या क्रमांकावर होते. पण आमच्या सरकारने सहा महिन्यांच्या आत राज्य पहिल्या क्रमांकावर आणले. थेट विदेशी गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा योजना देणारे, जनतेला पाच लाख रुपयांचा विमा देणारे, शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेमध्ये वर्षाला १२ हजार रुपये देणारे, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे असे विविध क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचा दावाही त्यांनी केला.
-
तसेच गेल्या दसरा मेळाव्यात मराठा समाजास टिकणारे आरक्षण देण्याची शपथ येथेच घेतली होती. त्याची पूर्तता केली. पण आता या आरक्षणाविरोधात महाविकास आघाडीच न्यायालयात गेल्याचा आरोप त्यांनी केला.
-
मुंबई महापालिकेत गेल्या २५वर्षापासून तुमची सत्ता होती, पण तुम्हाला लोकांच्या सुखदु:खाशी काही देणे-घेणे नव्हते. मुंबईचा विकास थांबला होता. पण आम्ही धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, घाटकोपर येथील रमाबाई झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावला असून मुंबईतील रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प राज्य सरकार ताब्यात घेऊन पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
-
“तुम्ही बंगल्यांवर बंगले बांधले. पण धारावीकरांनी चिखलातच राहावे ही तुमची अपेक्षा आहे का, “असा सवालही धारावी पुनर्विकासावरून शिंदे यांनी ठाकरे यांना केला.
-
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप सरकार बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलणार असा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे तिकडे एक गठ्ठा मतदान झाले. पण आपले मतदार सुट्टी बघून फिरायला गेले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत थोडा फटका बसला असला तरी शिवसेना(ठाकरे) यांच्यासमोर १३ ठिकाणी आम्ही लढलो, त्यात आम्ही सात जागा जिंकल्या. त्यांना ४२ टक्के तर आम्हाला ४७ टक्के यश मिळाले, त्यांच्यापेक्षा जास्त यश मिळविले. – एकनाथ शिंदे
-
त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर जनतेने दिले असून विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सावध रहा, लोकसभेप्रमाणे मतदानावेळी सुट्टीवर जाऊ नका, विधानसभेचा विजय भव्य-दिव्य असला पाहिजे, त्यासाठी आताच मतदार यादी तपासा, सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोचवा. विरोधकांना चारही मुंड्या चीत करण्याचा निर्धार करा. – एकनाथ शिंदे
-
महायुतीला पोषक वातावरण
राज्यात सध्या महायुतीला पोषक वातावरण असून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी सर्वच समाज घटक या सरकारचे सदिच्छादूत आहेत. त्यामुळे राज्यातील जनता महायुतीला मोठे करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. -
(Photos Source : Shivsena Page Facebook)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका