-
काल (१२ ऑक्टोबर) दसरा होता.
-
त्यानिमित्ताने राज्यात प्रचंड प्रसिद्ध आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले दसरा मेळावे पार पडले.
-
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा पर पडला.
-
यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संबोधित केले.
-
कालच्या मेळाव्यात युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण केले.
-
उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
-
त्याचबरोबर त्यांनी संविधान आणि लोकशाहीवर भाष्य केले.
-
‘निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल, अशी भावना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे. पण शिवसेनेतील फुटीवर तारीख पे तारीख हेच सुरू आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. इतिहासात तुमचे नाव कोरले जावे असे वाटत असल्यास लवकर निकाल द्या. – उद्धव ठाकरे
-
तीन – तीन सरन्यायाधीश झाले पण ते निकाल देऊ शकले नाहीत ही लोकशाहीची थट्टा आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीवर निकाल रखडल्याबद्दल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना शनिवारी टीका केली.
-
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले पण त्याच बरोबर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनाही लक्ष्य केले.
-
सरन्यायाधीशांच्या विरोधात बोलल्याने घरी जाईपर्यंत कदाचित न्यायालयाचा दणका आपल्याला बसू शकतो, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.
-
सरन्यायाधीश चंद्रचूड हे ८ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीपर्यंत निकाल लागेल की नाही याबाबत साशंकताच आहे. इतिसाहात नोंद व्हावी ही अपेक्षा असल्यास चंद्रचूड अजूनही वेळ गेलेली नाही. लगेचच निकाल द्या. न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी असली तरी न्यायदेवता सारे बघत आहे. सारी लोकशाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे अपेक्षेने बघत आहे. न्या.चंद्रचूड यांनी गणपतीसाठी पंतप्रधान मोदींना निवासस्थानी निमंत्रित केले. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण न्यायमंदिरात प्रवेश करता तेव्हा योग्य न्याय द्या हीच आमची अपेक्षा आहे. जगातील अशी विचित्र परिस्थिती आहे की ज्या लोकशाहीमुळे सरन्यायाधीश झाले असे तीन सरन्यायाधीशांची कारकीर्द संपुष्टात आली. पण न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे, असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले.
-
सत्तेत आल्यास धारावीची निविदा रद्द
सत्तेत आल्यावर धारावीची निविदा रद्द केली जाईल आणि सरकारची तिजोरी लुटलेल्या विद्यामान सत्ताधीशांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. अधिकाऱ्यांनीही सत्ताधिशांच्या मनमानीला बळी पडू नये. त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राची प्रचंड लूट सुरु असल्याचा आरोप केला. -
शिवसैनिकांना मराठी माणसाच्या एकजुटीची शपथ देताना शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी मशाल धगधगत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
-
उद्धव ठाकरे यांनी एक-दिड महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे भाकित वर्तवत सरकार आल्यानंतर अकरा दिवसात जे १६०० निर्णय घेण्यात आले त्यापैकी महाराष्ट्राच्या मुळावर उठणारे सर्व निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. भाजपाचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचे ते म्हणाले.
-
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल भाषणादरम्यान केली. धारावीत मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना, गिरणी कामगांराना त्याचप्रमाणे पोलीसांनाही घरे देणार असल्याची घोषणा ठाकरेंनी केली. त्याचप्रमाणे वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घरे देण्याचा महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाची पुन्हा सरकार आल्यानंतर अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
-
प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर
सरकार आल्यावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्याची घोषणा यावेळी ठाकरे यांनी केली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात शिवरायांची मंदिरे बांधण्यासाठी आणि त्या मंदिर परिसरात महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग चित्रस्वरूपात साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. -
(Photos Source : Shivsnea UBT Social Media)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”