-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि राजकीय जगतात शोक आणि चिंतेचे वातावरण आहे. (पीटीआय फोटो)
-
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील वांद्रे खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (पीटीआय फोटो)
-
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण ३ शूटर सहभागी होते, ज्यांनी ६ गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागल्या, त्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (पीटीआय फोटो)
-
मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कर्नैल सिंग आणि धरमराज कश्यप या दोन शूटर्सना अटक केली. करनैल सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. (पीटीआय फोटो)
-
दोन्ही गोळीबार करणाऱ्यांची चौकशी सुरू असून, या हत्याकांडामागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत. या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग तपासण्यात येत आहे. (पीटीआय फोटो)
-
या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला वांद्र्याच्या रस्त्यावर घेराव घालून तपास सुरू केला. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची ज्या ठिकाणी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम तपास करताना या छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता. (पीटीआय फोटो)
-
बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेते होते. त्यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली होती. २००४ ते २००८ दरम्यान ते महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि कामगार राज्यमंत्री होते. (पीटीआय फोटो)
-
बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूडशी घट्ट नाते होते. त्यांच्या प्रसिद्ध इफ्तार पार्टीत अनेक बडे बॉलीवूड स्टार्स हजेरी लावायचे. सलमान खान, संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या सेलिब्रिटींशी त्यांची घट्ट मैत्री सर्वश्रुत होती. (पीटीआय फोटो)
-
जेव्हा बाबा सिद्दीकी यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा सलमान खान आणि संजय दत्त सारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी लीलावती हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत होती. रुग्णालयाबाहेरही त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. (पीटीआय फोटो)
हेही पाहा- Photos : ‘असा’ झाला शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, उबाठा गट व महाविकास आघाडीबद्दल …

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा