-
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांना चाहूल लागलेली आहे.
-
दरम्यान राज्यामध्ये प्रतिक्षित असलेले दसरा मेळावे देखील दसऱ्याच्या दिवशी पार पडले.
-
यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावाही होता.
-
तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेदेखील दसरा मेळाव्यात एकाच मंचावर दिसले.
-
तर दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे मुंबईमध्ये पार पडले.
-
महाविकास आघाडी असो किंवा महायुती दोन्ही पक्षातील पुढाऱ्यांकडून आता निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
-
दरम्यान काल (१३ ऑक्टोबर) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक वक्तव्य केलं.
-
राज ठाकरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे.
-
“लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील”, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच “जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील”, असेही ते म्हणाले.
-
त्यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक तेवढे सगळे पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आताही चालत आहे. पुढील पाच वर्ष सुरू राहिल”, असे फडणवीसांनी सांगितले.
-
दरम्यान, याआधीही अनेक नेत्यांनी लाडकी बहीण योजनेवर विविध वक्तव्य केली आहेत
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- बाबा सिद्दीकी होते कोट्यधीश; मुंबई, राजस्थान ते UAE मधील तब्बल ‘इतकी’ मालमत्ता सोडली मागे!

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”