-
मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (Express Photo by Deepak Joshi)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.
-
या निर्णयाची काल रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणीही झाली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली आहे. (Express Photo by Deepak Joshi)
-
‘या’ टोलनाक्यांवर असणार टोलमाफी
आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका (Express Photo by Deepak Joshi) -
दरम्यान आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आहे.
-
या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
-
त्यामुळे आता आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
आज दुपारी २.३० वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही पाहा – Photos : लॅक्मे फॅशन वीकमधील अनन्या पांडेच्या आउटफिटने वेधले लक्ष, रॉयल लूकमध्ये केला…

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी