-
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. (फोटो: पीटीआय)
-
जम्मू-काश्मीरच्या नव्या सरकारमध्ये सुरिंदर कुमार चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी हे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. या दोघांकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घेऊया. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी नौशेरा येथून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी भाजपा नेते रवींद्र रैना यांचा ७,८१९ मतांच्या फरकाने पराभव केला होता. (फोटो: ओमर अब्दुल्ला/एफबी)
-
myneta.info वेबसाइटनुसार, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची संपत्ती केवळ ५५ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे ८० हजार रुपये रोख असून, २४ लाख ४४ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्याकडे ३० लाखांचे दागिने आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतीही मालमत्ता नाही. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आता जर आपण जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांच्या नेटवर्थबद्दल बोललो तर त्यांच्याकडे एकूण २ कोटी ३ लाख रुपयांची संपत्ती आहे. (फोटो: सुरिंदर चौधरी एफबी फॅन पेज)
-
१ लाख रुपये रोख आणि १ लाख ६९ हजार रुपये बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये जमा आहेत. याशिवाय त्यांनी १२ लाख ५२ हजार रुपयांच्या दोन विमा पॉलिसी घेतलेल्या आहेत. (फोटो: सुरिंदर चौधरी एफबी फॅन पेज)
-
सुरिंदर कुमार चौधरी यांच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर कार, ह्युंदाई वेर्ना आणि हिरो होंडा स्प्लेंडर बाईक आहे. त्यांची किंमत अंदाजे ४७ लाख रुपये आहे. (फोटो: सुरिंदर चौधरी एफबी फॅन पेज)
-
सुरिंदर कुमार चौधरी यांच्या नावावर नौशेरा येथे १५ लाख रुपये किंमतीची शेतजमीन आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावे ९ लाख रुपये किमतीची बिगरशेती जमीन आहे. सुरिंदर कुमार यांचेही नौशेरा येथे घर आहे ज्याची किंमत ८० लाख रुपये आहे. (फोटो: सुरिंदर चौधरी एफबी फॅन पेज)
-
याशिवाय जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीकडे ३६ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने आहेत. (फोटो: सुरिंदर चौधरी एफबी फॅन पेज)
हेही पाहा- कॅनडामधील सर्वात धनाढ्य भारतीय; रिअल इस्टेटचा ‘किंग’ अशी ओळख, वाचा मालमत्तेची माहिती…

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…