-
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहेत.
-
राज्यातील मतदान एकाच टप्प्यात पार पडेल, असे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जातील.
-
दरम्यान, आता विविध मतदारसंघातील लढती चर्चेत येत असताना, राज्यातील माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोण लढणार याचीही चर्चा होताना दिसत आहे.
-
महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजपा नेत्या शायना एनसी यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
-
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी यंदा भाजपाच्या नेत्या शायना एनसी या मोठे आव्हान ठरू शकतात.
-
दरम्यान कोण आहेत ‘शायना एनसी’? जाणून घेऊयात.
-
शायना एनसी या एक महिला राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रवक्त्या आहेत.
-
शायना एनसी यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात भाजपामधूनच केली आहे.
-
शायना एनसी यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग आहे.
-
तसेच त्या फॅशन डिझायनर देखील आहेत.
-
दरम्यान त्यांच्या नावाची चाचपणी सुरू असताना “पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल,” असं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
-
तर मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा वरळी विधानसभा मतदारसंघासाठी सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील या हाय प्रोफाइल मतदारसंघात नेमकं काय होणार? याकडे सर्वांच लक्ष असेल.
-
(सर्व फोटो साभार शायना एनसी फेसबुक पेज)
हेही वाचा- देशाच्या सर्वात ताकदवान ‘NSG कमांडों’ना ‘ब्लॅक कॅट कमांडो’ का म्हणतात?; NSG कमांडो कोण बनू शकतं, पगार किती मिळतो?
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ