-
दिल्लीतील प्रशांत विहार, रोहिणी जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शाळेबाहेर रविवारी सकाळी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी ७.५० च्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. (Photos: PTI)
-
अग्निशमन विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी आग लागली नाही किंवा भिंतीचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले.
-
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याठिकाणी जवळपास उभ्या असलेल्या वाहनांच्या आणि दुकानांच्या काचाही फुटल्याची माहिती मिळाली आहे.
-
सुदैवाची बाब म्हणजे या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शाळा आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
-
त्याच वेळी, पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू ठेवली आहे. स्फोटाची कारणे अद्याप समजू शकली नसून, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांनी घराबाहेर पडून परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला.
-
पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली.
-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवली आहे. अग्निशमन विभागाने लोकांना तपासात मदत करणारी कोणतीही माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन